यवतमाळ

सलून सुरू करण्याची परवानगी द्या युवक नाभिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

 

राज्यासह जिल्ह्यामध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शासनाने कोरोनाची साथ थांबविण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे यामध्ये दाढी-कटिंग व्यवसायाला 30 एप्रिल पर्यंत बंदी घातली आहे. मागील वर्षाचा विचार केला असता मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे व आता परत तीच पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे. या क्षेत्रांमध्ये दुसऱ्याच्या दुकानात रोजंदारी ने काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे येत्या 22 दिवसांच्या बंदीमुळे या लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे कसे. वरील सर्व बाबींचा विचार करता राळेगाव येथील नाभिक संघटनेकडून शहरातील सलून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिनांक आठ एप्रिल रोजी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनावर प्रवीण वनस कर अनिल दारवटकर जीवन कडवे अमोल चौधरी राजू नागतूरे सुधाकर खेडकर अमर वाटकर आकाश चिंचोळकर सतीश वैद्य सुनील धारवाडकर दीपक चौधरी सचिन घुगे नितीन सावरकर,अमोल चौधरी, आदींच्या सह्या आहेत

Copyright ©