यवतमाळ

कोरोणा लसीकरणाला आष्टोणा येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

(तहसीलदार कानडजे यांनी नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेण्याचे केले होते आवाहन)

 

आष्टोना येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेवुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
तहसीलदार डॉ कानडजे यांनी आष्टोना येथे कोरोना लसीकरण मार्गदर्शन शिबिर घेऊन जनतेला कोरोना लस संदर्भात जनजागृती करून मोलाचे मार्गदर्शन केले लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करा असे आवाहन केले त्या आवाहनाला आज आष्टोना गावात जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून आज आष्टोना येथे २९६ गावातील ग्रामस्थांनी कोरोणा लसीकरणाचा लाभ घेतला
यावेळी
तलाठी सातंगे साहेब, ग्रामसेवक पी‌. एस खडसे साहेब, सरपंच्या सौ अर्चनाताई सुरेश गोवारदीपे, उपसरपंच शंकर रामदास वरघट, ग्रा. पं. सदस्य रवींद्र कन्नाके, ग्रा. पं. सदस्य नारायण येरगुडे पंढरीनाथजी बोथले, मारोतराव ढवस, सागर काकडे, रुपेश पेचे, उपस्थित होते.

वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव
डॉ.अशिष बरगट व कर्मचारी यांनी लसीकरण कार्य पूर्ण केले श्री व्ही एस सावरकर औषध निर्माण अधिकारी
श्री व्ही एस काकडे आरोग्य सहाय्यक
कुमारी सोनल सुधाकर वारुलकर, सी एच ओ कु रेवती रत्‍नाकर साठवणे, श्रीमती एच बि गल्हाट आरोग्य सेविका, बी एन शिरसागर, एसबी बोरके श्रीमती अनिता चौधरी आशा सुपरवायझर उपस्थित होते

Copyright ©