यवतमाळ

नियमित डॉक्टर नसल्याने धानोरा पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

कोणी लक्ष देतील काय लक्ष? शेतकऱ्यांचा सूर

राळेगाव तालुक्यातील धानोरा हे एक नावाजलेल गाव अशी या गावची ओळख. गावात करोड रुपये खर्च करून पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला मात्र या दवाखान्यात नियमित सेवा देण्यासाठी डाॅक्टरच नसल्याचे चित्र पहावयास मिळते.ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. धानोरा पशुवैद्यकीय दवाखाना अतंर्गत अनेक गावाचा समावेश येतो त्यात धानोरा, येवती, वनोजा, चिखली, अंतरगाव, कोपरी, वाढोडा, रोहणी, दापोरी, उदंरी, जागजाई, व कळंमनेर इत्यादी गावे या पशुवैधकीय दवाखाना धानोरा शी जुडली आहे. मात्र नियमित या दवाखान्यात डाॅक्टरच नसल्याने अनेक जनता तसेच शेतकरी वर्गाला याची झळ पोचून नाहक त्रास सहन करावा लागतो, जुलै २०१७ पासून नियमित डाॅक्टर नसल्याने एकट्या कंपाउंडर च्या भरोवश्यावर या दवाखाण्याचा खेळ चालतोय,हा कंपाउंडर खरच दवाखान्याशी जोडलेल्या गावाला वेळेवर उपचार साठी भेट देतो की फक्त आपली खुर्ची दाबत बसतो अशी उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे,उन्हाळ्याचे दिवस गेले की लागताच पावसाळा सुरू होते पावसाचे दिवस लागले की जनावरे बिमार पडु शकते त्यामुळे शेतकऱ्यांची डॉक्टर वीणा तारांबळ उडू नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन धानोरा पशुवैद्यकीय दवाखाण्याला नियमित डाॅक्टर देण्यात यावे अशी ग्रामस्थ व शेतकरी वर्गानी विनंती केली आहे

Copyright ©