यवतमाळ

दक्ष नागरीक फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना शहरात पोलीस चौकी व ईतर मागण्यांचे निवेदन

शहरातील महिलांची छेडछाड व चिडीमारीवर आळा घाला मागणी

यवतमाळ – महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक तसेच अवुधतवाडी पोलीस स्टेशन येथे दक्ष नागरिक ङ्गाऊंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता व गुन्हेगारांवर वचक बसावा आणि विशेष करून महिलांसाठी आणि मुलींसाठी कुठलीही घटना घडली तर त्या पटकन जाऊन आपली तक्रार करू शकेल, दिवसें दिवस महिलांवरील अत्याचार वाढत चाललेले आहे त्यांच्यावर होणारी छेडछाड, चिडीमारी यावर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील भोसा रोड, नागपूर रोड, आर्णी रोड, धामणगाव रोड, पिंपळगाव रोड येथे पोलीस चौक तसेच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा तसेच प्रत्येक वेळेस शहर पोलीस स्टेशन किंवा अवधूत वाडी पोलीस स्टेशनला जाणे शक्य होत नाही, एक्सीडेंट झाला किंवा मारामारी झाली किंवा कुठली घटना घडली जवळपास पोलीस चौकी असणे खूप महत्त्वाचे आहे. महिला असुरक्षित आहे त्यामुळे शहरात वाढीव चौकी असणे आवश्यक आहे.
शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीसांचे मोबाईल नंबर ठळक अक्षरात काही किलोमीटर अंतरावर असावे तसेच शहरातील सी. सी. टिव्ही कॅमेरे रोडवरील काही बंद आहे ते त्वरित सुरु करावे आणि जिथे आवश्यक आहे तिथे कॅमेरे लावावे जेणेकरून गुन्हेगारावर वचक राहील. महिलांना न्याय मागता यावा या अनुषंगाने दक्ष नागरिक फाउंडेशनच्या राज्याध्यक्ष सौ. अलका कोथळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी राज्य कार्याध्यक्ष माणिक पांडे, प्रवक्ता प्राजक्ता टिकले, सचिव करुणा धनेवार, जिल्हा महिला सचिव डॉ. कविता बोरकर, शहराध्यक्ष सरला इंगळे तसेच दिलीप इंगळे उपस्थित होते.

Copyright ©