यवतमाळ

आर्णी शहरातील मंजुर पाणीपुरवठा योजना लवकर मार्गी लावा मुख्याधिकारी यांना मनसे कडुन निवेदन

 

आर्णी:- आर्णी शहरात अनेक नेत्यांच्या प्रयत्नामुळे शहरात नव्यानेच नव्या दराने अरुणावती धरणावरुन पाणीपुरवठा योजना विधीमंडळ अधिवेशनात मंजुर करण्यात आली. मंजुर योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात अली परंतु गेल्या दोन महीण्यापासुन सदर योजनेचे अद्यापपर्यंत कोणतेही टेंडर न निघाल्याने आर्णीच्या नागरीकात आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यात मनसे या पक्षाने आर्णी शहरात लवकरात लवकर हि योजना मार्गी लावण्यासाठी काल दिनांक ६/४/२०२१ रोजी आर्णी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यु. डी. तुंडलवार यांना निवेदन दिले आले सदर योजना मार्च/एप्रिल महिन्यात निघणारे टेंडर आद्यापर्यत का काढले नाही नगरपरिषद या योजनेबाबत आजपर्यंत कोणताही ठराव झालेला नसल्याने हि योजना मार्गी लागेल की नाही हे गुलदस्त्यात आहे की मागील अनेक वर्षांपासून आर्णीतील पाणीपुरवठा योजना रखडलेलीच राहणार की होणार? यात आर्णी शहरातील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे तेव्हा सदर योजना लवकरात लवकर मार्गी लावा यासाठी आर्णी मनसेच्या वतीने सचिन येलगंदेवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी कपिल ठाकरे, संदिप गाडगे, अरविंद मस्के, प्रशांत चव्हाण,दिपक बोरकर यांनी प्रभारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन सादर केले

 

Copyright ©