यवतमाळ

तालुका कृषी कार्यालय फोटोसेशन करण्यात व्यस्त*, योजनेचे साहित्य शेतकऱ्यांना देण्याऐवजी स्वतःच करू लागले फस्त

आत्मा च्या अधिकाऱ्यांनी लावले जागो जागी फलक ,योजने अंतर्गत काही मदत मिळेल का याची वाठ पाहत आहेत शेती मालक

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे कृषी विकासासाठी सर्वसमावेशक व सहभागी धोरण राबविण्याबरोबरच शेतकऱ्यांना विस्तार सेवा पुरवून शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित सुयोग्य व आवश्यक मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन सन 1998 साली महाराष्ट्र्र राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी (ATMA)म्हणजेच आत्माची स्थापना झाली. व राज्यात दोन जिल्ह्यात आत्मा चे कार्य राबविण्यात आले व 2005 पासून संपूर्ण राज्यात आत्मा कार्यरत झाली. शेतकऱ्यांना प्रगती पथावर घेऊन जान्यायासाठी कार्य करणे. आत्मा मार्फत शेती तंत्रज्ञानाची अधिक माहिती मिळण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर तसेच राज्याच्या बाहेरची शेती सहलीचे आयोजन करने. आपली शेती किफायतशीर करण्या बरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत सुयोग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मा मार्फत मोलाचे सहकार्य करणे. शेतकऱ्यांना नफा मिळविण्यासाठी उत्पादन वाढीबरोबर शेतमालाची साठवणूक पॅकिंग प्रक्रिया पूरक उद्योग तसेच बाजार व्यवस्थापन यांचा संगोपन विचार आत्मा मार्फत करण्यात येते.शेतकरी केंद्रीय कार्यक्रम राबविणे व तसेच कृषी प्रयोग उद्योगासाठी विविध विभागांमध्ये समत्वय आणून उत्तम प्रकारे योजना तयार करणे हे ध्येय आत्मा संस्था चे असून सुद्धा. मात्र दिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांना आत्मा कडून काहीच फायदा होत नसल्याचे अनेक शेतकरी आत्मा प्रति नाराजी व्यक्त करत आहे. आत्मा चे कार्य फक्त कागदावरच असल्याचे दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांन कडून बोलल्या जात आहे.गेल्या आठवड्यात तालुक्यातून फक्त 4 शेतकऱ्यांना छत्री चे वाटप करून गाजावाजा मात्र भरपूर करण्यात आला. विकेल ते पिकेल या आशेने दिग्रस आर्णी रोडवरील शेतकऱ्यांनि शेतातील फळे खाट टाकून त्यावर फळे ठेऊन विक्री करीत असलेल्या एका शेतकरी राज्याला प्रश्न केला असता असे लक्षात आले की शेतकऱ्यांना आपल्या थाटलेल्या फळविक्री खाट स्टॉल ला लावायला आत्मा ने फक्त फलक दिले.बाकी दिले ते आश्वासन. अनेक योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित का?.आत्मा ने शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा अशी नागरिकातून मागणी होत आहे

Copyright ©