यवतमाळ

कोरोना रगणांची खासगी कोविड सेंटर व्दारा प्रचंड आर्थिक लूट पञकारांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले निवेदन

 

जिल्हाधिकारी म्हणाले तक्रारी करावे कारवाई करण्याचे दिले आश्वासन

यवतमाळ प्रतिनिधी.. जिल्हयातील खासगी कोरोना सेंटर चालकांनी, कोरोना रुग्णांची अक्षरशः गैरप्रकारे आर्थिक लूट चालवली आहे. लूट थांबविण्यासह विविध मागण्यांचे आज 6 एप्रिल रोजी, येथील प्रमुख पञकारांनी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.. कोरोनाचे आगमन होऊन वर्ष झाले.यादरम्यान खासगी कोरोना सेंटर व्दारा मनमानीपद्धतीने कोरोनारूगणांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. सरकारी नियमांचा त्यांनी अक्षरशः फज्या उडविला आहे. ही लूट थांबवावे, प्रत्येक खासगी कोविड सेंटर मध्ये आॅडीटर नेमावे, त्याची नावें व मोबाइल नंबर जाहिर करावे,सर्वच खासगी सेंटर ने रूगणांकडून रक्कम वसूल करताना, पक्के बिल आॅडीटर व्दाराच द्यावे, यासह अनेक मागण्यांचे निवेदन देताना, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारवाईचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी रूगण आणि नातेवाईकांना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या, covid19takrar@gmail.com या मेलवर आणि 7276190790 या What’sapp वर पक्या बिलासह तक्रारी करावे, असे आवाहन केले. निवेदन देताना, अनिरुद्ध पांडे तरूण भारत, नागेश गोरख हिन्दूस्तान, रघुवीरसिंह चौहान महासागर, संजय सावरकर युवा राष्ट्र दर्शन, भाष्कर मेहरे आयबिएन लोकमत, निलेश फाळके भारत ई टीव्ही, उल्हास निनावे युसिएन न्यूज़, विवेक गावंडे टीव्ही 9, नितीन पखाले लोकसत्ता -मतदार, विरेंद्र चौबे भाष्कर,मनिष जामदळ पुढारी, मकसूद अली में. मराठी न्यूज़, विजय बुंदेला सिंहझेप,जयंत राठोड जनसंग्राम, किशोर जुननकर नमोमहाराष्ट, यांच्यासह अनेक पञकार उपस्थित होते….

Copyright ©