यवतमाळ

राळेगाव महावितरण कंपनी चा भोंगळ कारभार

राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर (कोदूरली) या शिवारातील कृष्णाजी दादाजी अल्बनकर यांच्या शेतात इलेक्ट्रिक पोल हा तारासाहित पडलेला आहे ,ह्या पोलचे कनेक्शन चालू असल्या कारणाने त्या शिवारात जीवित हानी होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही,
कृष्णा जी दादाजी अल्बनकार यांनी वीज महावितरण कंपनीचे उप अभियंता गजबे साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असता 2 महिने उलटून गेले पोल दुरुस्त झाला नाही, जर त्या पोलपासून जीवित हानी झालीतर याला जबाबदार कोण? असे कृष्णाजी दादाजी

अल्बनकर यांनी म्हटले आहे,
पोल पडल्यामुळे समोरील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुद्धा 2 महिन्यापासून बंद आहे, पहिलेच कोरोनाचा प्रादुर्भाव त्यात नापिकी शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जळका शिवारातील सरपंच मारोती सलाम यांच्या शेतातील वीज पुरवठा सुद्धा 2 महिन्यापासून बंध आहे व इतर शेतकऱ्यांचे सुद्धा विज पुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे फरमोठे नुकसान होत आहे’,
रात्री बे रात्री शिकार करणारे शिकारी शिकार करण्यासाठी फिरत असतात त्यांना काय माहीत की पोल हा पडलेला आहे म्हणून, जर त्यांना करंट लागला तर?म्हणून श्रीरामपूर येथील नागरिकांनी सतत तक्रार केली असता यांच्याकडे विज महावितरण कंपनीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते, म्हणून विज महावितरण कंपनीने याकडे त्वरित लक्ष देऊन पोल दुरुस्त करावा अशी मागणी श्रीरामपूर येथील शेतकऱ्यांनी विज महावितरण कंपनी कडे केली आहे,

Copyright ©