यवतमाळ

एक भिंत माणुसकीची व्यथा आणि व्यवस्था -के.मधुराज

आता आम्ही बदलत चाललो आहे आता आमच्या व्यथा ही सांगायला आम्हाला लाज वाटतंय कारण या मातीतून तयार झालेल्या “माणुसकीच्या भिंती “आम्ही तोडल्या आता माणुसकी संपली.आम्ही आता व्यवस्थेचे बळी होतं आहोत आधी एक कुटुंब होतं माणुसकीचं चार भिंतींचं घरं होतं माणुसकीच्या मातीचं तिथं माणुसकी जन्माला येतं होती पण आता नाही राहील्या त्या मातीच्या भिंती आणि ती एक भिंत माणुसकीची.आम्ही मानुसकीचं नातं संपवतो आहे आमचं कुटुंब उध्वस्त करतो आहे ही व्यथा आमचं वेसन झाले आहे ही व्यथा आणि व्मवस्था हा जिर्ण ज्वर मानवाच्या शरीरात कोरोणा सारखा आंतक वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय फक्त प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.संकल्प करा विचाराचा ! ग्राम स्वराज्य महामंच चा
चला निर्माण करण्यासाठी! एक भिंत माणुसकीची
कुटुंबातील भाऊबंदकी संपली मानसातली माणुसकी संपली समाजातली सहिष्णुता संपली ही व्यथा आमच्या मानवी मुल्यांच्या ह्या व्यवस्था आम्ही उध्वस्त करतो आहे हे आमचं दुर्दैव आहे सताचे विचार श्रेष्ठ की आपलेच अनुभव श्रेष्ठ जिवंत मानसाच्या अनुभव घ्यायचे की मेलेल्या माणसाच्या आठवणी अंगीकृत करायच्या ह्या भुतकाळ आपल्याला कमी पडत आहे हे आपल्या आयुष्यातील मोठं अदभुत रहस्य आहे.कधी करायची सुरुवात माणुसकी च्या भिंती बांधायला कोण पुढे येईल कोण पुढारी होईल नाही इतरांसाठी पण स्वतः साठी तरी एकदा सुरुवात करा परावलंबी होण्या पेक्षा स्वावलंबी व्हा कारण आपल्या ला ” एक भिंत माणुसकीची ” उभी करायची आहे हेच आपल्या आयुष्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचं पहीलं प्रतिबिंब असेल

मधुसूदन कोवे 
ग्राम स्वराज्य महामंच

Copyright ©