यवतमाळ

प्रा.अनिल म याउल यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा

 

यवतमाळ – स्थानिक बाबाजी दाते बी. पी. एड्. कॉलेज शिवाी नगर उमरसरा रोड यवतमाळ येथे बुधवार दि. 31/03/2021 रोजी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक अनिल मधुकर याउल यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विशुद्ध विद्यालय यवतमाळ या संस्थेचे सचिव सतीशजी ङ्गाटक होते. प्रमुख अतिथी म्हणून एज्युकेशन सोसायटी यवतमाळचे सचिव चंद्रकांतजी रानडे आणि विशुद्ध विद्यालयाचे समन्वयक विजयराव कासलीकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजनानी व हार अर्पणांनी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रा. अनिल याउल यांच्या कार्याचा गौरव करुन महाविद्यालयाच्या व संस्थेच्या कोणत्याही कार्यामध्ये तसेच संस्थेनी सोपविलेली कोणतीही जबाबदारी प्रा. अनिल याउल यांनी तत्परतेने पूर्ण करुन एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापकांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल गौरद्गार काढून त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी चंद्रकांतजी रानडे, विजय कासलीकर, प्रा. डॉ. मार्कस लाकडे यांनी समुचित मनोगत व्यक्त करुन प्रा. अनिल याउल यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विशुद्ध विद्यालय या संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते उपाध्यक्ष श्रीमती विद्याताई केळकर, कोषाध्यक्ष मंगेश केळकर यांनी भ्रमणध्वनी द्वारेपण प्रा. याउल यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात सचिव सतीशजी ङ्गाटक यांनी प्रा. अनिल म. याउल यांच्या एकुण 32 वर्षाचा सेवेचा गौरव करतांना एक दिलदार कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व म्हणून प्रा. याउल यांचा कार्याचा गौरव केला व उर्वरित भावी जिवनाकरिता शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र क्षिरसागर यांनी केे तर सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रेम जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पसायदानानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©