विदर्भ

अमरावती विभाग कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परीषद सुसंवाद सभा संपन्न

अमरावती विभाग कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परीषद सुसंवाद सभेचे दिनांक १मार्च ला गुगल मिट द्वारे आॕनलाईन आयोजन करण्यात आले.या सभेला राज्य कार्यकारणी चे कार्याध्यक्ष प्रा.सुनिल शिंदे कोल्हापूर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.सभेला अध्यक्ष म्हणून अमरावती विभागिय अध्यक्ष प्रा,बालाजी लाभसेटवार यवतमाळ हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारणी कोषाध्यक्ष प्रा.रंजय चौधरी राळेगाव व प्रा.वसंत चव्हाण सदस्य यांनी मार्गदर्शन करुन विभागाच्या सदस्यांना संघटन मजबूत करण्यासाठी सुचना दिल्या. आॕनलाईन सभेमध्ये प्रास्तविक प्रा.दिपक अंबरते अमरावती विभागिय सचिव यांनी केले.तसेच आॕनलाईन मार्गदर्शन प्रा.श्रीधर जाधव वाशिम , प्रा.गोवर्धन गावंडे बुलढाणा ,प्रा.गोपाल राठोड अकोला,प्रा.भाष्कर जाधव,प्रा.विरेंद्र मुरड अमरावती ,प्रा.गणेश लोहे यवतमाळ ,प्रा राजेश तायडे यवतमाळ ,प्रा.रविकीरण मागे वाशिम यांनी मार्गदर्शन केले. प्रा.संतोष सांगळे बुलढाणा ,प्रा विठ्ठल पवार अकोला ,प्रा.कैलास निमसे मुंबई हे उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयात इतिहास विषय हा स्पर्धापरीक्षा साठी महत्वपूर्ण असून एमपीएससी , युपिएससी, स्टाॕफ सिलेक्शन,रेल्वे रिकृमेट बोर्ड व इतर तयारी करणाऱ्या विद्यार्थांचा कल व ओढा वाढत आहे.त्या दृष्टिकोनातून आपण आॕनलाईन पद्धतीने कशा प्रकारे नवनवीन शैक्षणिक साहीत्य मुलांपर्यत पोहचवू शकतो व त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो याविषयी या सुसंवाद सभेमध्ये विचार मंथण केल्या गेले.प्रा.सुनिल शिंदे कोल्हापूर राज्य कार्याध्यक्ष म्हणाले संपुर्ण महाराष्ट्रातील इतिहास शिक्षकांनी विद्यार्थामध्ये शैक्षणिक सुसंस्कार करतांना विषेश काळजी घ्यावी. तसेच शिक्षकांनी अनेक संदर्भ ग्रंथाचे वाचण करावे व अध्यापन करतांना पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त ज्ञाण देण्याचा प्रयत्न करावा.कृतिपत्रीका आराखडा हा विद्यार्थांना व्यवस्थित समजावून सांगावा,वेळोवेळी विद्यार्थांना आॕनलाईन मार्गदर्शन करावे ,त्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे तसेच बालभारती व बोर्ड यांनी सर्व विषयांच्या प्रश्नपेढि तयार केल्यामुळे विद्यार्थांना सराव करणे सोपे झाले आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले. शेवटी आॕनलाईन सभेचे अध्यक्ष बालाजी लाभसेटवार यवतमाळ यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन डाॕ.प्रा.ज्ञानेश्वर भगत अमरावती यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दिपक अंबरते अमरावती यांनी केले.अशी माहिती प्रा रंजय चवधरी यांनी दिली आहे.

Copyright ©