यवतमाळ

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यवतमाळ तर्फे दि १९ फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती घराघरात

 

सजावट स्पर्धेची बक्षिसे, कोरोनाची परिस्थिती पाहता, आज दिनांक 2 एप्रिल 2021 ला विजेत्या मावळ्यांना मा. विरोधीपक्षनेते नगरपरिषद यवतमाळ, श्री. चंद्रशेखर चौधरी, प्रा. प्रविण भोयर, प्रा. योगीराज अरसोड, श्री.शशिकांत खडसे, विजय निकम आणि बंडू परडखे इ. संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्यांचा घरी जाऊन सन्मानित केले.
स्पर्धेला यवतमाळ सह जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूण 70 मावळे स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामधून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोशन गणेश बुटके, द्वितीय पारितोषिक दिग्विजय व,अनिकेत पांडुरंग कौवरासे तर तृतीय सौ. राणी अनुराग मिसाळ यांनी पटकावले. शिवजयंती घराघरांत सजावट स्पर्धेत सहभागी सर्व मावळ्यांचे अभिनंदन . स्पर्धेच्या यशस्वीते करीता प्रकल्प अधिकारी प्रा. योगीराज अरसोड, संयोजक शशिकांतजी खडसे, सि.ए. श्रीदीप इंगोले,विजयराव खडसे,विजय निकम महेद्र वेरुळकर,सचिन इंगोले,विजय ठाकरे,विष्णू बुटले,मंगेश फुटाणे, संकेत लांबट यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©