यवतमाळ

पोलिस मित्र युवा महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी स्वप्नील राठोड यांची निवड

तालुक्यातील पार्डी नस्करी येथिल सामाजिक युवा कार्यकर्ते स्वप्नील राठोड सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील संघर्षाची धडपड पाहून सतत होत असलेल्या असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी सहकार्य करून न्याय मिळवून देण्यासाठी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पोलिस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुकतेच प्रा. नितीन जयस्वाल यांच्या सहीचे एक नियुक्ती पत्र देवून निवड करण्यात आली आहे.
आपणास सामाजिक कार्यात सहभागी होवून कार्य करण्याची इच्छा असून मला एक व्यासपीठ मिळाले असल्याने माझ्या कार्याला स्पूर्ती मिळाली आहे. पुढील काळात सविधनाचे व महासंघाचे निःस्वार्थीपणे समर्पित भावनेने वरिष्ठांच्या आदेशाचे व त्यांच्या शब्दाचे पालन करून समितीच्या ध्येय धोरणाला बाधा न पोहचविता कार्य करीत राहणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आपल्या सारख्या ग्रामीण भागात वास्तव असलेल्या युवकाला कार्याध्यक्ष पदी निवड करून कार्य करण्याची जी संधी दिली यात आपण संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन जयस्वाल यांचे मनापासून आभार मानतो असेही त्यांनी कळविले असून त्यांच्या या निवडीने हितचिंतकांकडून व पा सर्कलच्या जनतेकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. असे त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.

Copyright ©