यवतमाळ

तालुक्यात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद 

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासन ,नगरपंचायत प्रशासनाने कोरोना तपासणी व लसीकरणाला वेग दिला आहे . प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार डॉ रवींद्रकुमार कांनडजे,नगरपचायतीचे मुख्याधिकारी अरुण मोकळ पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार राळेगांव पोलीस स्टेशन ,वडकी ठाणेदार ,तालुका वैद्यकीय अधिकारी गोपाळ पाटील गटविकास अधिकारी पवार हे प्रयत्नरत आहेत प्रत्यक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू केले आहे .काही गावा मध्ये तापाची साथ असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने तीथे गावकऱ्या ची आरोग्य तपासणी सुरू केली आहे यात काही कोरोना रुग्ण असल्यास गृह विलगिकरण करण्यात आले आहे कोरोना लसीच्या संदर्भात शंका कुशंका कोणीही बाळगू नये ती सुरक्षित आहे .संचारबंदीचे नियम आहे तेच आहे.लग्न समारंभ अटी आहेच स्वतःची काळजी घ्या असे प्रशासन सांगतच आहे .राळेगांव नगर पंचायती च्या सी ओ नी शहरातील व्यापारी दुकानदार ,वृत्तपत्रविक्रेते भाजीपाला व फळ विक्रेता दूध विक्रेते फेरीवाले व इतर व्यवसाईकानी लस घ्यावी लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे व निशुल्क आहे या मुळे बारा एप्रिल पर्यन्त ग्रामीण रुग्णालयात सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते पाच पर्यन्त जाऊन स्वतःची नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे सांगितले आहे जे या आदेशाचे पालन करणार नाही त्यांची आस्थापना पुढील आदेशापावेतो बंद करण्यात येईल याची दखल सर्वांनी घेण्याचे आव्हान न प ने केले आहे. तालुक्यात लसीकरणाला वेग आला आहे लसीकरण केल्याने आपण सुरक्षित राहू कुटूंब सुरक्षित राहील शेवटी आपला जीव महत्वाचा आहे या साठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे असे तालुका प्रशासनाने आव्हान केले आहे.

Copyright ©