यवतमाळ

कृ.उ. बा. स. सभापती ऍड.प्रफुल मानकर यांचे सभापती पद रद्द करा 

प.स.सभापती प्रशांत तायडे यांनी केली जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार, तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ 

विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक नसल्याने राळेगाव कृ. उ. बा. स. चे सभापती ऍड. प्रफुल मानकर व उपसभापती बाबारावजी निम्रड यांना सभापती व उपसभापती पदावरून पायउतार करावे अशी तक्रार जिल्हा निबंधकाकडे आज करण्यात आली. या मुळे राळेगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. प. स. सभापती प्रशांत तायडे यांनी ही तक्रार दाखल केली असून मा. उच्च न्यायालयाचा स्वयंस्पष्ट आदेश असल्याने त्वरित कार्रवाही करण्याची मागणी केली आहे. या वेळी माजी कृ. उ. बा. स. सभापती सदाशिवराव महाजन, विवेक दौलतकार, आदि उपस्थित होते.मा. उच्च न्यायालयाने एका निर्णयात ग्रा.वि. का. मधून पायउतार झालेल्यानां संचालक पदावर राहता येणार नाही असा निकाल दिला. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील कलम 13 अनुसार सदस्यांची निवड करन्यात येते. मात्र संचालक नसल्यास अपात्र करण्याचे स्वयंस्पष्ट आदेश आहे. या नियमानुसार जिल्हा निबंधकांनी सभापती ऍड. प्रफुल मानकर यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर बोलतांना पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे यांनी, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही ठोस कामं कृ उ. बा. स. च्या माध्यमातून झालेले नाही. शेतकऱ्यांचा सन्मान होतं नाही.
नियमानुसार ते या पदावर राहू शकत नाही. सभापती पदावरून त्यांना पायउतार व्हावेच लागेल अशी भावना वेक्त केली.

Copyright ©