यवतमाळ

कु.काश्यपीने वृक्ष पूजन करून साजरी केली होळी

यवतमाळ – शहरातील रहिवाशी विनोद दोंदल याची मुलगी कु.काश्यपी ही नेहमीच आपल्या कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्या मुळे सम्पूर्ण शहरात प्रचलित आहे.
होळी या सणाला होळी पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होते,सर्वत्र चढाओढ लागली असते की आपली होळी सर्वात मोठी असली पाहिजे, ह्या कारणाने मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड करून होळी पेटवली जाते, ह्या मुळे प्रदूषण वाढते व वृक्षतोड होऊन जमिनीची धूप पण वाढते,शहराच्या आजूबाजूचे जंगल सुध्दा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन ओस पडत चालले आहे.
ह्याच कारणाने काही महिन्यांपूर्वी आपल्या वडिलां सोबत शहराच्या आजूबाजूच्या जगलात जाऊन विविध प्रकारच्या वृक्षाच्या फळ बिया कु.काश्यापी ने फेकल्या जेणेकरून त्यातील काही बिया उगवेल व शहराच्या आजूबाजूचे जगलं थोड्या फार प्रमाणात हिरव्यागार होईल,याच कारणाने तिने संकल्प केला की वृक्ष पूजन करून होळी साजरी करावी व लोकान पर्यंत एक चांगला सामाजिक संदेश जाईल,तिच्या या सुप्त उपक्रमामुळे तिचे सर्वत्र खूप वाहवाई व कौतुक होत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©