यवतमाळ

भिमजयंती निमित्य बैठकीचे आयोजन अँबुलन्स सेवा देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरोग्य सेवा सामीतीचे गठन

 

आर्णी (प्रतिनिधी): मागील वर्षी प्रमाणे या ही वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भिम जयंती सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्यावर शासकीय निर्बंध लादल्या जाण्याची शक्यता असल्यामुळे भिम जयंती उत्सवाबाबत तालुक्यातील आंबेडकरी जनतेची बैठक आयोजित करण्यात आली. कोरोना महामारीमुळे ढासळलेले सार्वजनिक आरोग्य लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरोग्य सेवा समितीचे गठन करून अँबुलन्स सेवा देण्या बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंबेडकरी जनतेचा सर्वात मोठा उत्सव हा भिम जयंती उत्सव असून हा उत्सव संपूर्ण जगभरात मोठ्या थाटात साजऱ्या केला जातो. मात्र मागील वर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे भिम जयंती सार्वजनिक ठिकाणी न करता शासकिय नियमांचे पालन करून घरोघरी साजरी करण्यात आली. एक वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षी भिमजयंती साजरी करण्याच्या उत्साहावर पुन्हा नव्याने कोरोना महामारीचे सावट आले आहे. तेव्हा 14 एप्रिलला येऊ घातलेल्या भिम जयंती उत्सवाबाबत चर्चा करण्याकरिता आज सकाळी 11 वाजता तालुक्यातील संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या बैठकीचे आयोजन संभाजी नगर येथील भूषण भगत यांच्या राहत्या घरी करण्यात आले होते. या बैठकीमध्ये तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य विषयक समस्येचा विषय प्रामुख्याने मांडण्यात आला. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात सेवा देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरोग्य सेवा अस्थायी समितीची स्थापन करण्यात आली. या समितीच्या नेतृत्वाखाली बोलेरो कंपनीची अँबुलन्स सेवा देण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला असून लवकरच तालुक्यातील जनतेच्या सेवेकरिता समितीची अँबुलन्स येणार असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. यावेळी आर्णी येथील उद्धवराव भालेराव, भूषण भगत, दिलीप मनवर, गौतम वाकोडे, रवी देवस्थळे,संजय खोब्रागडे, देविदास भगत, गणेश हिरोळे, विशाल मुरादे, महेश गायकवाड, मंगेश पाटील, देवेश खोब्रागडे, विशाल भवरे, संदेश भगत, कमलेश खरतडे, चेतन भगत, अक्षय पेटारे, प्रशिक नगराळे, सुरज भगत, डोळंबा येथील महादेव लंबे, किशोर जाधव, मजहर हुसेन, विकी सरोदे, सुमेद वानखडे, सचिन भगत, योगेश भगत, महागाव येथील प्रल्हाद कांबळे, अनिल इंगोले, कलगाव येथील अमोल मनवर, जवळा येथील सुनील सुखदेवे, राहुल मुजमुले, तरोडा येथील आशिष रहाटे, माळेगाव येथील अतुल कांबळे, वरुड येथील प्रशिक मुनेश्वर, चिकणी येथील रामदास प्रघाणे,दाभाडी येथील यादवराव मानकर, स्वप्नील मानकर, कुऱ्हा येथील अक्षय नरांजे, आंबोडा येथील शरद पाटील उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©