यवतमाळ

गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर ची झाडाला भिषण धडक चालक जागीच ठार

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत तळेगाव (भारी) जवळ यवतमाळ कडून चंद्रपूर येथे सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान टँकर क्र. एम एच ४८ ए वायं/४८९८ जात असताना चालकाने नियंत्रण सुटल्याने टँकर ची झाडाला जबर धडक बसली हि धडक इतकी जबर होती की ट्रक चां समोरील भागाचा चुराडा झाला तर टँकर इंजन पासुन वेगळी होऊन ५० फूट दुर जाऊन पडली यात चालक बळीराम फुलचंद गुत्ते वय २४ रा. दहिसना घाट ता. परळी जिल्हा बीड असे मृतक चालकाचे नाव आहे या प्रकरणी ३०४ ( अ )२७९ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे जमा. कैलास लोथे, संजय राठोड चालक अविनाश वाघाडे यांनी घटनेची पाहणी करून चौकशी करीत आहे

Copyright ©