यवतमाळ

कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य

 

अमोल येडगे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार

यवतमाळ, दि. 27 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्युच्या संख्येत झालेली वाढ कमी करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, असे नुतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.

जिल्ह्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लसीकरण मोहीम आणखी गतिमान करण्याचे नियोजन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसुत्रीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे. नागरिकांनीसुध्दा नियमितपणे मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिं आणि टेस्टिंग करून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर तसेच मृत्युदर कमी करण्यावर भर देण्यात येईल. यासोबतच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वच क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याला आपले प्राधान्य आहे, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.

____________________

पाच मृत्युसह जिल्ह्यात 418 जण पॉझेटिव्ह

392 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 418 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 392 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 62 व 56 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष आणि माहूर (जि. नांदेड) येथील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.27) पॉझेटिव्ह आलेल्या 418 जणांमध्ये 309 पुरुष आणि 109 महिला आहेत. यात यवतमाळातील 165, दिग्रस 70, नेर 28, आर्णि 22, पुसद 20, उमरखेड 20, वणी 16, घाटंजी 14, दारव्हा 12, मारेगाव 11, राळेगाव 9, बाभुळगाव 8, झरी जामणी 7, कळंब 5, महागाव 5, पांढरकवडा 5 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.

शनिवारी एकूण 4439 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 418 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4021 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2448 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 27151 झाली आहे. 24 तासात 392 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 24095 आहे. तर जिल्ह्यात एकूण 608 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 257347 नमुने पाठविले असून यापैकी 248313 प्राप्त तर 9034 अप्राप्त आहेत. तसेच 221162 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©