यवतमाळ

या महागाईच्या काळात अपंगाना तिन हजार रूपये पेन्शन देण्याची तनपुरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

 

अंपगाना मिळत असलेली एक हजार रूपयाची पेन्शन वाढवत वाढती माहागाई पाहता तिन हजार रूपये करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक अशोक तनपुरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या बाबत मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, अपंगासाठी अहोरात्र झटणारे व न्याय मिळवुण देणारे प्रहारनेते ना.बच्चु कडु यांच्या प्रर्यन्ताने पुर्वी 600 रूपये ऐवजी एक हजार रुपये ऐवढी पेन्शन अंपगासाठी नीचीत केली आहे मात्र अलीकडे या महागाईच्या काळात अंपगाना ही रक्कम अपुरी पडत आहे. अंपग व्यक्ती जादा काम करू शकत नाही, व पुर्वीच्या अशीक्षीत पालकांमुळे अंपगाची जुनी पिढी न शीकल्याने कुठे नौकरी पण करू शकत नाही. वाढती माहागाई पाहता व कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिनाम पाहता आज अंपग बांधव हालाकीचे जिवन जगत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. शासनाच्या ईतर योजने बाबतही केवळ अंपगासाठी नावापुरतीचं घोषणा होते मात्र अनेक योजनेपासुन अंपग बांधव आज ही वंचित असल्याचा पत्रकात त्यांनी राग व्यक्त केला आहे. अन्नसुरक्षा, पिवळे राशन कार्ड यामध्ये अंपगाना अदयाप पर्यन्त समाविष्ट केले नसल्याचे सांगत एक प्रकारे अंपगाची चेष्टा सरकारकडुन केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक हजार पेन्शन ही अंत्यत अपुरी असुन ख-या अर्थाने अपंगासाठी मदतीची भावना सरकारमध्ये असेल तर किमान तिन हजार रूपये पेन्शन अंपगाना दयावी अशी मागणी त्यांनी शेवटी पत्रकात केली आहे.

Copyright ©