यवतमाळ

अमोल येडगे यवतमाळ जिल्हाचे नवे अधिकारी

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी बदली झाली. त्यांच्या जागेवर अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी सिंह वेगवेगळ्या कारणाहून चर्चेत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी तक्रार केली होती. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. याच कारणामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्हाधिकारी सिंह विविध कारणाने चर्चेत होते. प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याची आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीने त्यांच्याबाबत कमालीची नाराजी निर्माण झाली होती. अशात त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अमोल येडगे हे सण २०१४ चे आयएस अधिकारी आहेत . जळगाव येथे प्रशिक्षण केले असून हिंगोली जिह्यातील कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे नाशिक उपविभागीय अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तर मुंबई येथे माहिती व तंत्रज्ञान संचालक म्हणून काम केले आहे. डिसेंबर २०२० मध्ये अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रुजू झाले होते. सातारा जिल्ह्यातील कराड येथील मूळचे रहिवाशी असल्याचे विस्वनिय वृत्त आहे.

Copyright ©