यवतमाळ

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहिर केलेले प्रोत्साहन अनुदान त्वरित द्या वे

●ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे उपविभागीय महसूल अधिकारी राळेगांव यांना निवेदन ●

मागील वर्षी च्या अंदाजपत्रका दरम्यान महाराष्ट्र शासनाने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली,पण वर्ष उलटून गेले तरी शासनाने आपला शब्द पाळावा व अतिशय बिकट आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे अध्यक्ष जानराव गीरी यांचे नेतृत्वात शेतकरी बांधवांनी,शैलेश काळे उपविभागीय महसूल अधिकारी व डाँक्टर रविंद्र कानडजे तहसीलदार राळेगांव यांना दिलेले आहे .
यावेळी उपाध्यक्ष सुरेश वर्मा, संचालक मोहन देशमुख,प्रभाकर राऊत,कृष्णराव राऊळकर,विनायक नगराळे,गजानन पाल,विनोद नरड,विजय केवटे,सौ संध्याताई बोथरा,सौ संगिताताई पिंपरे सह शेतकरी बांधव प्रकाश मेहता,गोवर्धन वाघमारे,चंद्रकांत मशरु,गजानन पुरोहित,अशोक पिंपरे,सुखानंद लोहकरे,सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Copyright ©