यवतमाळ

कोरोना चाचणी शिवाय घाटंजी तहसील कार्यालयात प्रवेश नाही

 

घाटंजी- दिवसेंदिवस दिवस कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला प्रतिबंध बसावा कोरोनाची साखळी तुटावी यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. याकरिता घाटंजी तहसील प्रशासनाने एक चांगले उपक्रम हाती घेतले असून तहसिल कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना प्रथम कोरोना चाचणी करा व नंतर तहसील कार्यालयात प्रवेश करा. या मोहिमेमुळे बुधवारला कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढल्याची दिसून येत होती. शासन स्तरावरील कार्यात सैदव तत्पर असणाऱ्या येथिल तहसीलदार पूजा माटोडे यांनी स्वतः मेहनत घेऊन घाटंजी तालुक्यात कोरोना प्रसारावर सुरुवाती पासूनच नियंत्रण मिळविले आहे. मात्र सध्या पॉझिटिव्ह संख्या वाढीस लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी प्रत्येक नागरिकाने करावी यासाठी
व्यापाऱ्यासह सर्वांची चाचणी तहसील कार्यालयाच्या सभागृहात सुरू असून तहसिल कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कोरोना चाचणी करावी व नंतरच प्रवेश करून आपले कार्यालयीन कामकाज करावे असे प्रशासना कडून सांगितल्या जात आहे.

Copyright ©