यवतमाळ

जनावरे भरलेला ट्रक पोलिसांच्या स्वाधीन

 

सात ट्रक टोल नाका तोडुन फरार झाले व एक ट्रक जप्त

यवतमाळ वरून भाब रोड टोल नाका वरून जात असलेले ८ ट्रक भरधाव वेगाने होते या ट्रक मध्ये जनावरांना निर्ययीपणे कोंबण्यात आले असून त्यांना कत्तलखाना विक्रीसाठी नेण्यात येत असताना जाब टोल नाका येथील मुलांनी टोल फाडण्या साठी ट्रक ला थांबविण्यात येत होते परंतु ट्रक चालकांनी टोल नाका दिसताच वाहनाचे वेग वाढवला असताना ७ ट्रक टोल तोडुन फरार झाले व १ ट्रक मध्ये तांत्रिक अडचणी मुळे तो तितेच थांबला असता तेथील लोकांनी त्यांना पकडले या संपूर्ण घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली असता या ट्रक मध्ये २० जनावरे पकडले या मध्ये दोन जनावरे(बैल) खाली पडून अर्धवट मेलेल्या अवस्थेत होते ईतर जनावराची सुटका करण्यात आली सविस्तर वृत्त असे की ८ट्रक पैकी ७ ट्रक इतक्या भरधाव वेगाने तिथून फरार झाले त्या पैकी एक ट्रक क्र. एम.एच.-४०बी.एल ६११२ या ट्रक ला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले हि तस्करी गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे यांची माहिती कोणालाच न पडता या टोल नाका येथून फरार होतात आज मध्यरात्री चा सुमारास या ट्रक चा परधाफास झाला असून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले जनावरांची एकूण किंमत तीन लाख व ट्रक ची किंमत दहा लाख असून एकुण मुध्ये मला जप्त करण्यात आला आहे व पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहे
या सात ट्रकचा ग्रामीण पोलीस शोध घेणार का ?

Copyright ©