यवतमाळ

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भारतीय नारी रक्षा संघटनेचे निवेदन

 

डॉ.सुरेखा पियुष बरलोटा व पियुष बरलोटा यांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या उपचारांने सौ.बासुरी शैलेश त्रिपाठी यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ! भारतीय नारी रक्षा संघटनेची मागणी

 

यवतमाळ दि.२३ मार्च -:भारतीय नारी रक्षा संघटना गेल्या अनेक महिन्यापासून मुलीं व महिलांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात नेहमीच आवाज उठवत आली असून असाच एक प्रकार यवतमाळ शहरातील रहिवासी असलेल्या श्रीमती.दुर्गा मिश्रा यांच्या मुलीसोबत घडला श्रीमती.दुर्गा मिश्रा यांची एकुलती एक कन्या बासुरी हिचा विवाह येळाबारा येथील शैलेश त्रिपाठी यांच्या सोबत झाला व ते गुण्यागोविंदाने संसार करत होते.यातूनच बासुरी ही गरोदर राहिली व तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व उपचारासाठी यवतमाळ येथील स्त्री रोगतज्ञ डाॅ.सुरेखा पियुष बरलोटा यांचेकडे उपचार सुरू केले व नियमित उपचार सुरू असताना नवव्या महिन्यात डिलिव्हरी साठी दि.१ मार्च रोजी सौ.बासुरी शैलेश त्रिपाठी हिला दवाखान्यात दाखल केले.मात्र डिलेवरी पूर्वी तिची कोरोना चाचणी करणे गरजेचे असताना अशी कुठलीही चाचणी त्यांनी केली नाही व तिचे बाळंतपण सिजरीन या प्रकारे केले व तिने मुलाला जन्म दिला मात्र ती उपचार सुरू असताना त्या रुग्णालयात कोविड पॉझिटिव झाली व तिला चार दिवसांनी सुट्टी दिली सुट्टी दिल्यानंतर दि.५ मार्चला घरी येताच काही तासातच तिची प्रकृती अचानक बिघडली व तिला खोकला व घाबरल्या सारखे वाटू लागल्याने परत पुढील उपचारासाठी डाॅ.सुरेखा बरलोटा यांच्या हॉस्पिटल येथे नेले मात्र स्त्री रोग तज्ञ सौ सुरेखा पियुष बरलोटा या दवाखान्यात हजर नसल्याने त्यांचे पती पियुष बरलोटा मनोरुग्ण तज्ञ यांनी उपचार करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांनी डॉ. महेश शहा यांच्या कोविड सेंटरला पाठविले व तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले विशेष म्हणजे कोणत्याही रुग्णांची शस्त्रक्रिया करायची झाल्यास कोरोणा चाचणी करणे अत्यंत गरजेचे असताना कुठली चाचणी न करता थेट सिजरिन डिलिव्हरी केली या उपचारादरम्यान सौ.बासुरी त्रिपाठी ही बरलोटा हॉस्पिटल मध्येच कोरोना पॉझिटिव झाली व डॉ.शहा यांच्याकडे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मात्र आता तिच्या बाळाची काळजी घेण्यास वृद्ध आजी असून तो नवजात बालक पोरके झालेली आहे.तसेच त्या नवजात बालकाची ही कोरोणा चाचणी करण्याची तसदी डाॅ.सुरेखा बरलोटा यांनी आज पर्यंत घेतली नाही.या संपूर्ण प्रकाराला डॉ.सौ.सुरेखा पियुष बरलोटा (स्त्री रोग तज्ञ) व डॉ.पियुष बरलोटा (मनोरुग्ण तज्ञ) हे जबाबदार असून त्यांच्यावर बासुरी शैलेश श्री पाटील यांच्या मृत्यूस जबाबदार धरून दोघांवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी तसेच त्यांचे हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून तसेच त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल असा ईशारा भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने देण्यात आला.
निवेदन देतांना मृतक मुलीची आई दुर्गा मिश्रा,
विनोद दोंदल,सुकांत वंजारी,दुर्गा पटले,विजय चौधरी आदी उपस्थित होते.

Copyright ©