यवतमाळ

काही दिवसापूर्वीच बनवलेल्या दिग्रस दारव्हा रोडवर पडल्या भेगा

 

अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे काम,या रस्त्या वरून प्रवाशांना प्रवास करतांना फुटतोय घाम

दिग्रस दारव्हा राष्ट्रीय महामार्गाचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू असून सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने एका महिन्यापूर्वी बनलेले राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर मोठमोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काम बोगस झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

महाराष्ट्र शासनाकडून जास्तीतजास्त विकास कामे व्हावी. या उद्देशाने शासनाकडून राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठया प्रमाणात होताना दिसत आहे.
त्याच उद्देश्याने दिग्रस ते दारव्हा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तीन ते चार वर्षापासून सुरू असून सदर काम अतिशय मंदगतीने सुरू असल्याने वाहन चालकांना मोठा प्रमाणात त्रास सहन करून घ्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे. तर काही ठिकाणी अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले जीव गमवावे लागले आहे. तर अनेक अपघातग्रस्ताना अपंगत्व प्राप्त झाले आहे. तसेच या ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मिलीभगतामुळे अनेक अपघातग्रस्ताचे घर सुद्धा उद्ध्वस्त झाल्या असल्याचे दिसत आहे .
शासनाच्या नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे काम पाटील कन्ट्रक्शन कंपनीकडून मागील तीन ते चार वर्षापासून अतिशय मंद गतीने सुरू असल्याने अनेक वाहनचालकाच्या जीव धोक्यात आले आहे. आणि खूप ठिकाणी अपघात सुद्धा झाल्याचे दिसत आहे. सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम दिग्रस ते गांधीनगर पर्यंत पाटील कंट्रक्शन कंपनी घेतलेले आहे. आणि गांधीनगर ते चिंचोली पर्यंत जय भद्रा कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून या जयभद्रा कन्ट्रक्शन कंपनीने सहा महिन्यात गांधीनगर ते चिंचोली पर्यंत एका साईडचे काम पूर्ण केल्यामुळे वाहन चालकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पाटील कंट्रक्शन कंपनी मागील काही दिवसापासून काम सुरु असून अद्याप पर्यंत पूर्ण झालेले दिसत नाही.

सदर काम चार वर्षापासून सुरू असून यां राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अनेक ठिकाणी अर्धवट च आहे. त्यामुळे वाहनचालकांना खूप मोठा त्रास सहन करून घ्यावे लागते तसेच पाटील कन्ट्रक्शन कंपनीने मागील एक महिन्यापूर्वी बनविलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे कामावर अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर पडलेल्या भेगाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Copyright ©