यवतमाळ

जिल्ह्यात 611 जण कोरोनामुक्त 6 मृत्युसह 471जण पॉजिटिव्ह

यवतमाळ, दि. 20 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 611 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला असून 471 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 65 वर्षीय महिला आणि 42 वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील 85 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 65 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि घाटंजी येथील 83 वर्षीय पुरुष आहे.
शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 471 जणांमध्ये 327 पुरुष आणि 144 महिला आहेत. यात यवतमाळातील 242, दिग्रस 46, उमरखेड 32, दारव्हा 27, पुसद 26, बाभूळगाव 25, आर्णी 23, नेर 17, पांढरकवडा 13, रालेगाव 6, घाटंजी 5, वणी 5, महागाव 1 आणि इतर ठिकानचे 3 रुग्ण आहे.
शनिवारी एकूण 4771 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 471 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4300 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2098 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 24211 झाली आहे. 24 तासात 611 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 21567 आहे. तर जिल्ह्यात एकूण 546 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 226186 नमुने पाठविले असून यापैकी 215583 प्राप्त तर 10603 अप्राप्त आहेत. तसेच 191372 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले
आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©