यवतमाळ

महावितरणाच्या वतीने कोरोना काळातील वीज बिलाची पांढरकवड्यात सक्तीने सुरू वसुली व महावितरण च्या अधिकाऱ्यांची अरेरावी थांबविण्यासाठी भाजयुमो तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

 

कोराना काळातील वीजबिल माफ करण्यात येणार असल्याने बोलल्या जात होते शिवाय करोना काळात महावितरण कंपनीच्या खाजगी कंत्राटदाराने ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग सुद्धा नेले नव्हते ना काळातील वीज बिल माफ करण्याची सर्वत्र स्तरावरून मागणी होत असतानाच दुसरीकडे महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांकडून सक्तीने वीजबिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे विज बिल भरा नाहीतर वीजपुरवठा खंडित करण्यासह अनेक ठिकाणी वीज कनेक्शन कापण्यात सुद्धा येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहक आसह शेतकऱ्यातुन सुद्धा रोष व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी केळापुर तालुका भाजपा युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले यांनी आपल्या टीम सोबत चक्क उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेतली व महावितरणाच्या वतिने सुरू असलेली विज बिलाची वसुली करण्याची अरेरावी पध्दत थांबविण्याकरीता निवेदन दिले. तसेच महावितरणाच्या कार्यालय जाऊन विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देवून महावितरण च्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार केली आहे. यावेळी भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रितेश बोरेले, भाजपा तालुकाध्यक्ष शंकर सामृतवार, भाजयुमो शहराध्यक्ष मनोज त्रिशुलवार, नगरसेविका रिता कनोजे, उमाशंकर कनोजे, विशाल दुबे, संजय निकोडे, सागर व्यास, शुभम घोडमारे, पंकज डाकुर, अक्षय चीतलवार, शुभम ठाकूर, रोहित चांदेकर, आकाश उईके, धीरज शर्मा, कुणाल लांडे, शुभम जुमडे आदी अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.

Copyright ©