यवतमाळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांचे वीज वितरण कंपनी ग्रामिण आर 1सेंटर च्या कार्यालयात “ठीय्या आंदोलन”

 

ग्रामिण भागातील 41 गावातील 366 विजग्राहकाची कापलेले कनेक्शन 2 दिवसात जोडण्याचे कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन..

वीज कनेक्शन कट केल्यास गाठ स्वाभिमानिशी…श्याम अवथळे

खामगाव: लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे तात्काळ थांबवा व तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण ग्रामीण आर 1 सेंटर कार्यालयात 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या वतीने घरगुती वीज बिल व शेतकऱ्यांचे वीज बिलाचा वसुलीचा सपाटा सुरू असून शहरी व ग्रामीण भागामध्ये सक्तीची वीज बिल वसुली विद्युत वितरण कंपनीतर्फे सुरू आहे विज बिल वसुली च्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली दि 19 मार्च वार: शुक्रवारी रोजी दुपारी 1 वाजता खामगाव येथील वीज वितरण कंपनी ग्रामीण 1सेंटर च्या कार्यालय सहायक अभियंता जुमळे साहेब यांच्या दालनात 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे वीज वितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली वीज वितरण कंपनी व अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे संपूर्ण कार्यालय हादरले होते चुकीचे बिल तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावे नंतरच वीजबिल भरून घेण्यात यावे. नोटीस न देता कुठलीही कनेक्शन कापण्यात येऊ कापलेले कनेक्शन तात्काळ जोडून देण्यात यावे लाईनमन शेतकऱ्यांशी व ग्राहकांशी सौजन्याने वागत नाहीत ग्राहकांशी चर्चा न करता नोटीस न देता वीज कनेक्शन खंडित करतात हे वीज धोरणाच्या विरोधात आहे सहायक अभियंता जुमळे साहेब ग्रामीण आर 1 यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष अवथळे यांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामीण आर 1 सेंटर च्या हद्दीतील 41 गावातील 366 लोकांचे कापलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडून देण्यात यावे व वीज बिल वसुली थांबवून फक्त पहिल्या टप्प्यातील वीज बिल भरून घेण्यात यावे जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका घेताच कार्यकारी अभियंता जायभाये साहेब यांनी भेट देऊन मागण्या ऐकून घेऊन 2 दिवसाच्या आत तोडलेले 366 लोकांचे वीज कनेक्शन जोडून देण्यात येईल व पहिल्या टप्यातील वीज बिल भरून घेऊ असे आश्वासन दिल्या नंतर त्या ठिकाणी “ठिय्या आंदोलन” मागे घेण्यात आले
या आंदोलनात गिरीधर देशमुख,मासुमशहा मस्तानशह,सोपान खंडारे,अनिल मिरगे,आतिष पळसकर,निलेश देशमुख,निलेश गवळी,विठ्ठल महाले,श्रीकृष्ण काकडे,दीपक देशमुख,नाना खटके, अभिजित ठाकरे, समाधान भातुरकार,गजानन करडेल शुभम गावंडे,भारत गायकवाड,दर्शन वानखडे,मंगेश राठोड,वहिद खान, रुपेश अवचार,आकाश गायकवाड, सचिन अवचार,स्वप्निल गोफणे,करण अवचार,मगेश गवळी,आकाश इंगळे, प्रितम इंगळे,सुरज हिवाळे या पदाधिकारिसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते..

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©