विदर्भ

राष्ट्रीय महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात–दोघे जखमी

 

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने– खराब रस्त्यामुळे अपघात.

इतर मार्गांची कामे जलद गतीने होत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे काम का रखडले की मुद्दाम रखडवले ?– जनतेचा प्रश्न.

 

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिचखेड फाट्याजवळ दि.१७ च्या रात्री १० वाजताच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. दैव बलवत्तर होते म्हणून अप्रिय घटना टळली.

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरणाचे काम गेल्या कित्येक वर्षापासून रखडत सुरू आहे. अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणात जागोजागी खराब झालेला आहे. या खराब रस्त्यामुळे वाहनचालकांचा वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागतो. कोणते वाहन कधी कुठे कसे अपघातग्रस्त होईल याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. काल रात्री अशाच प्रकारे अमरावती कडून अकोला कडून अमरावती कडे जात असलेली तवेरा गाडीची एका ट्रक सोबत धडक झाली. यामध्ये तो दोघांना किरकोळ मार लागला दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला तर याच ठिकाणी एक पाईप घेऊन अमरावतीकडे जात असलेला ट्रक विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर जाऊन धडकला. यामध्ये मात्र कोणालाही काही दुखापत झाली नाही.चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. या ठिकाणी माना पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी सर्व लोक रस त्याला दोष देत होते.चारही वाहनधारकांनी  तक्रार न दिल्यामुळे माना पोलिस स्टेशनला वृत्त लिहीपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे सांगण्यात आले.सदर महामार्गाचे काम का रखडत सुरू आहे ? याबाबत काहीही कळायला मार्ग नाही. समृद्धी मार्ग, सुपरफास्ट मार्ग असे वेगवेगळे नाव असलेली मार्गाची जोरदारपणे जलद आणि झपाट्याने कामे होत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे काम कासव गतीने का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचेही म्हटल्या जात आहे.

Copyright ©