विदर्भ

मूर्तिजापुरात ४० किलो गांजा जप्त झाल्याने खळबळ– आरोपीस दि.२० पर्यंत पोलीस कोठडी.

 

गुटखा विक्री पाठोपाठ गांजा विक्रीचे केंद्र बनत आहे मुर्तीजापुर.

शहरातील जुनी वस्ती भागात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून धाड टाकून ४० किलो गांजा जप्त केल्याची कारवाई दि.१७ च्या रात्री ८ वाजताच्या सुमारास करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली. शहरात ही लागोपाठ दुसरी कारवाई झाली. यापूर्वीदेखील या पथकाने गांजा पकडला होता. त्यानंतर ४० किलो गांजा पकडला सापडल्याने गुटखा विक्री पाठोपाठ आता गांजा विक्रीचेही केंद्र मूर्तिजापूर बनत असल्याचे म्हटल्या जात आहे. ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असून मागील लाँकडाउनचा मध्ये  लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे म्हटल्या जात आहे. मोठ्या प्रमाणात गांजा विक्री सुरू असताना स्थानिक पोलिसांना याबाबत थांगपत्ता लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

काय याबाबत प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे दहशतवादी विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या त्यांनी येथील जुनी वस्ती भागात मौलापुरा येथील एका घरात धाड टाकली असता घरामध्ये ३ लाख रुपये किमतीचा ४० किलो गांजा मिळून आला. यावरून अब्दुल राजक अब्दुल रफिक याला ताब्यात घेण्यात आले सदर आरोपी विरुद्ध मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात नाँरकोटीक्स कायदा कलम २० ब नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीस दि.२० पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या पथकाने यापूर्वी देखील बस स्टँड परिसरातून गांजा जप्त केला होता.त्यानंतर ही त्यांनी शहरात दुसरी मोठी गांजा जप्तीची कारवाई केली आहे.

Copyright ©