महाराष्ट्र

करोना संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

 

 

मुंबई प्रतिनिधी : करोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई लोकलमध्ये अधिकृत मास्क विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना अवघ्या ५ रुपयांत मास्क उपलब्ध होणार आहे. एप्रिलपासून मुंबईकरांना हे मास्क खरेदी करता येतील.

मुंबईतील करोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांमध्ये मध्य रेल्वेने अनोख्या पद्धतीने सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. के. के. विद्युत लिमिटेड या खासगी कंपनीच्या मदतीने धावत्या लोकलमध्ये मास्क विक्री करण्यात येणार आहे. दोन प्रकारचे मास्क विक्रीसाठी असणार असून, त्यांची किंमत अनुक्रमे ५ आणि ७ रुपये असणार आहे. एफडीए प्रामाणित हे मास्क असून एकदा वापरण्यायोग्य आणि पुन्हा वापरण्यायोग्य असे हे मास्क असणार आहेत

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Featured

Copyright ©