यवतमाळ

भांब (राजा) येथील गळफास घेऊन इस्माची आत्महत्या

 

यवतमाळ तालुक्यातील भांब राजा येथील मोहन नामदेव उईके याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दुपारी ४ वाजता घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. यांच्या मागे पत्नी १२ वर्षीय एक मुलगा तर ७ वर्षाची एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. एक गावातील मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व सर्वांना हसत ठेवणारा त्यांच्या या अचानक मृत्यू मुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे कारण कळू शकले नाही या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहे

Copyright ©