यवतमाळ

घाटंजी येथे स्नेक वायपर एडव्हेंचर अँड नेचर क्लब यांच्या मार्फत पक्षी पीऊ चे वाटप

 

घाटंजी (तालुका प्रतिनिधी)कोरोना महामारीच्या काळात  सतत च्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ अली आहे. यात सर्वांचेच हाल होताना दिसून येत आहे. माणसाकडे पाहिजे ते उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणीशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. तरी तो समस्येवर मात करून काहीतरी पर्याय काढून आपली उपजीविका चालवून घेत आहे. अश्यातच उन्हाळा या ऋतु सुरू झाला असून कडक उन्हाने सुरुवातीलास जीव कासावीस होण्यास सुरुवात झाली आहे. या उन्हाळ्यात तापमान जास्त प्रमाणात तापणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यात बहुतांश नदी नाले आतापासून कोरडे पडले आहे. यामध्ये पशू पक्षी यांचा खूप मोठा प्रश्न समोर आला आहे. या पशू पक्षाचा केविलवाणा प्रसंग आपणास आपल्या दृष्टी पटलास पडत आहे. मात्र त्यांना बोलता येत नसल्याने आपल्याला लागलेली तहान व भूक याची व्यथा मांडू शकणार नाही. या साऱ्या बाबीची कल्पना करून मुक्या जीवाना उन्हाच्या दाहकतेत त्यांना वेदना होवू नये त्यांच्या समोर उभे असलेल्या अन्न पाण्याची समस्या सुटावी म्हणून घाटंजी येथिल पक्षीप्रेमी स्नेक वायपर एडव्हेनचर अँड नेचर क्लब यांच्या मार्फत पक्षी पिऊ चे वाटप करण्यात आले.

घाटंजी येथिल पक्षीप्रेमी प्राणीमात्रावर नेहमी दया करून त्यांचेसाठी हवी ती मदत करण्यासाठी धडपडणारा सर्पमित्र सुमित हिम्मतसिंग मून हया चमूने स्वतः मेहनत घेऊन पिप्याच्या पत्राचे दोनशे पक्षीपिऊ तयार करून शहरातील पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद या ठिकाणी भेट दिली आहे. तर ज्या ठिकाणी पक्षिपिऊची आवश्यकता असेल त्याठीकांनची परिस्थितीचे गांभीर्य जाणून माणूसकी धर्माचे पालन करून त्यांना चारा पाणी मिळावे पक्ष्यांचे अवहेलना होवू नये ही बाब मनाशी हेरून सुमित मून यांच्याशी ८८०८४८४५१२ या नंबर वर संपर्क करून पक्षिपिऊ व खाद्य मिळवावे असे आवाहन करण्यात आले असून आपापल्या परीने आपण सुध्दा अशी संकल्पना निर्माण करून हे पक्षी उपयोगी कार्य करू शकता असे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक सेवा समजत हा उपक्रम भाविक भगत, स्नेहदिप चव्हाण, सारंग क्षिरसागर, श्रुती घायवाल, पल्लवी पुडके यांनी विशेष सहकार्य केले आहे. या उपक्रमाने तालुका वासियाकडून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

Copyright ©