यवतमाळ

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी आकाश पानपट्टे यांची नियुक्ती

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी परिषदेच्या यवतमाळ जिल्हाअध्यक्ष पदी मुडाणा येथील आकाश पानपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . एक प्रगतशील शेतकरी सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि लघु उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख असलेले आकाश पानपट्टे हे युवकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व असून त्यांनी सामाजिक राजकीय स्वरूपाचे अनेक कामांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे आकाश पानपट्टे यांची नियुक्ती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Copyright ©