विदर्भ

खदानीत ट्रॅक्टर कोसळल्याने चालकाचा मृत्यू   

 

तालुक्यातील भगोरा शिवारात असलेल्या खदानी मध्ये ट्रॅक्टर खाली येत असताना अचानक उतारावरुन कोसळल्याने ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि.१६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील भगोरा येथील खदानीत ट्रॅक्‍टर घेऊन खदानी मध्ये खाली येत असताना अचानक ट्रॅक्टर उतारावर असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्‍टर खदानीत कोसळला. यामध्ये चालक संदीप अर्जुन तायडे वय ३५ वर्षे राहणार जामठी खुर्द  यांना  डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने  गंभीर जखमी झाले.सदर चालकास मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.याबाबत  मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला सुमेध राऊत यांच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस करीत आहे.

Copyright ©