सामाजिक

स्पेशल राजवाडी घृत(तूप) ऍक्युप्रेशर मसाज

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” ही म्हण आपण ऐकलीच असेल. तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे  अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. स्वयंपाकासोबत अनेक धार्मिक विधींमध्येदेखील तुपाचा वापर केला जातो. या शिवाय घरात मंगल प्रसंगी देवाजवळ तुपाचा दिवा लावण्यात येतो. सण-समारंभ, लग्नविधी अशा अनेक कार्यक्रमातील जेवणाच्या पंगतीत पाहुणचार करताना आग्रहाने तुप वाढलं जातं. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासून आहारात/विहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं. तुपात मधूर, शक्तीशाली, पित्तशामक, मेद आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे घटक असतात. शिवाय त्यात व्हिटॅमिन्  ए आणि डी, कॅल्शियम, फॉस्फरस मिनरल्स, पोटॅशियम, अॅन्टी ऑक्सिडंट आणि अॅन्टी व्हायरल घटकदेखील असतात. दोन प्रकारचं तूप तुम्ही आहारात वापरू शकता. गाईच्या दुधापासून आणि म्हशीच्या दुधापासून असे दोन प्रकारचे तूप तयार केले जाते. या दोन्ही प्रकारच्या तुपाच्या सेवनाने शरीर बळकट आणि निरोगी होण्यास मदत होते. यासाठीच जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे
मात्र आजकाल तुपाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. तुपामुळे वजन वाढतं या समजापोटी अनेक जण आहारातून तुप वर्ज्य करतात. मात्र आयुर्वेद शास्त्रानुसार तुप शरीराच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते. म्हणूनच आयुर्वेदात तुपाला सात्विक अन्नाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक विकारांमध्ये तुपात औषधे टाकून त्याचे चाटण रुग्णाला दिले जाते. शरीरस्वास्थ निरोगी राहण्यासाठी रिकाम्यापोटी तुपाचे सेवन केल्यामुळे अथवा नाकात शुद्ध तूप टाकल्याने अनेक आजारपणे दूर ठेवता येतात.
तुपाचे आरोग्यदायी फायदे (Benefits Of Ghee)
तुपाचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात. तुपाचा वापर नियमित करण्यासाठी हे फायदे अवश्य वाचा व स्वास्थवर्धक-आरोग्यवर्धक करिता उपयोगात आणा..
शरीराला उष्णता मिळते (Energised Body)
इन्स्टंट एनर्जी मिळते (Instant Energy)
स्मरणशक्ती वाढते (Increases Memory)
मुळव्याधीचा त्रास कमी होतो (Removes Root Cause)
सांधेदुखीतून आराम मिळतो (Relieves Joint Pain)
लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम (Good For Kids)
वजन नियंत्रित राहते (Controls Weight)
तूप कॅन्सर पेंशटसाठी उपयुक्त (Useful In Cancer)
अशक्तपणा कमी होतो
हातापायाची जळजळ कमी होते (Reduces Inflamation Of Limbs)
डोळ्यांचे विकार कमी  होतात (Increase Eye Disorders)
मूत्रविकार कमी होतात (Reduces Urinary Tract Infection)
उचकी थांबते (Stops Hiccups)
अल्सर बरा होतो (Helpful In Ulcer)
जुलाबाचा त्रास कमी होतो (Deficiency Of Laxatives)
तुपाचे त्वचेवर होणारे फायदे (Benefits Of Ghee For Skin In Marathi)
तुपाचे आरोग्याप्रमाणे त्वचेवरही खूप चांगले फायदे होतात. त्वचेची निगा राखण्यासाठी हे फायदेदेखील तुम्हाला माहीत असायलाच हवे. यासाठी जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे
तुपामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. नितळ आणि चमकदार त्वचेसाठी तूप घेण्यासोबतच त्वचेवर तुपाने मालिश देखील जरूर करा. कारण तुपामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.
जखम, व्रण, पायांच्या टाचा फुटणे, अंगाला खाज येणे अशा त्वचेच्या समस्यांवर आपण शुद्ध तूपाचा मलमासारखा वापर करू शकतो.
जुने तूप पूर्वीच्या काळी युद्धात झाल्यामुळे होणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी वापरला जात असे. त्यामुळे तूप जितकं जुनं तितकं ते त्वचेसाठी उत्तम ठरतं.
त्वचेप्रमाणेच तुम्ही केसांनाही तूप लावू शकता कारण केसांवर तुपाचे होणारे फायदे अनेक आहेत.
नाकात तूप टाकून करा आजारपणांवर करा मात (Get Rid Of Diseases By Putting Ghee In Nose)
नाकात तूप टाकणे हा निरोगी राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी जाणून घ्यान नाकात तूप टाकल्यामुळे नेमकं काय होतं.
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी दररोज नाकात शुद्ध तेलाचे दोन थेंब टाका.
त्वचेवर अॅलर्जी उठत असेल तर नाकात तूप टाकल्यामुळे ती कमी होऊ शकते.
मायग्रेनच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल दररोज नाकात दोन थेंब शुद्ध तूप टाकण्याची सवय लावा.
डोकेदुखी थांबविण्यासाठी नाकात तूप टाकल्यामुळे अथवा डोक्यावर तुपाचा मसाज केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
नाकातून रक्त येत असल्यास नाकात तूप टाकल्यामुळे आराम मिळतो.
नाकाचे हाड वाढल्यास नाकात तूप सोडल्यामुळे बरे वाटते.
सर्दी झाल्यास नाकात तूप टाकल्यामुळे चोंदलेले नाक मोकळे होते
गरोदरपणात तूप देखील फायदेशीर आहे
स्पेशल राजवाडी घृत(तूप) ऍक्युप्रेशर मसाज प्रक्रिया ही करण्याची विधी किमान 2 ते 2.30तास आहे…
क्रिया विधी:-
1)प्रथम शरीराला गरम काढ्यायुक्त पाण्याने स्वच्छ धुणे,
2)15 मि सण बाथ घेणे,
3)ऍक्युप्रेशर बेलन मसाज करणे,
4)आयुर्वेदिक घटकाने युक्त तुपाने शरीराचे मसाज करणे…विधी 4 भागात
A)प्राथमिक समोरील भागास 2 वेळा मसाज करणे,
B)द्वितीय मागील बाजूस 2 वेळा मसाज करणे
ऐकून 4 वेळा क्रिया…
5)विविध आयुर्वेदिक घटकाने युक्त उबटन(उटणं) ने मसाज करणे व सण बाथ घेणे,
6)शेवटी स्टीमबाथ घेणे…
ही क्रिया महिन्यातील 1 वेळा घेणे व निश्चितच वरील फायदे आपल्याला मिळतील….
सौजन्य:-चौधरी आयुर्वेद व संशोधन केंद्र,
डॉ.विवेक चौधरी
मो.09373857138/09623327228

Copyright ©