विदर्भ

विना मास्क वावरणार्‍या २४ लोकांवर दंडात्मक कारवाई

 

(नागरिकांनो काळजी घ्या—आवाहन)

 

कोरोना चा प्रादुर्भाव आटोक्‍यात येण्याची चिन्हे अद्यापही दिसत नसल्याने प्रशासन  विविध प्रकारे  नियम व निर्देश पाळण्याकरिता उपाय योजना करीत आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना आज दि. १६/०३/२०२१ रोजी मुर्तिजापूर शहरात विनामास्क फिरणार्‍या २४ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिस प्रशासनाच्या मदतीने  ४८०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. त्याच प्रमाणे आज  मंगळवार बाजार हा मुख्य रस्त्यावर भरवण्यात आला होता.

कोरोना आजाराची वाढती पार्श्वभूमि लक्षात घेता शासन निर्देशानुसार मूर्तिजापुर शहरातील नागरिक ,सर्व  दुकानदार व्यापारी वर्गाची कोरोना स्वाब तपासणी करण्याबाबत प्रशासनाने तसे निर्देश दिले आहेत. करिता नागरिक,सर्व दुकानदार, व्यापारी वर्ग यांनी तपासणी करून घ्यावी.आज दि.१७ बुधवार रोजी कोरोना  स्वाब (swab) तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बायपास अमरावती रोड येथे सकाळी १०.०० ते ३.००  वाजे पर्यन्त करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी स्वाब देऊन तपासणी स्वतः होऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे नगर परिषद मुर्तिज़ापुर याचे कडून करण्यात आले आहे.

 

 

Copyright ©