यवतमाळ

डोंगरगाव येथील अवैध गौण खनिज उत्खनन फेरचौकशी प्रकरणी 28 लाख रुपये दंड कायम

 

 

महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील ई क्लास जमीन मध्ये 1198 ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन प्रकरणी सलग दुसऱ्यांदा फेर चौकशी प्रकरण मध्ये 1198 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे 28,75315 रुपये दंड कायम करून तहसीलदार महागाव यांनी 5 मार्च 2021 रोजी गैरअर्जदार शिवाजी गणेश देशमुख यांच्या विरुध्द आदेश पारित करण्यात आला आहे – तालुक्यातील डोंगरगाव येथील ई क्लास जमिनीमध्ये 2017 मध्ये गैरअर्जदार शिवाजी गणेश देशमुख यांनी जेसीबी मशीन व ट्रॅक्टरद्वारे 1198 ब्रास अवैध मूरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार महागाव यांनी 28 लाख 75 हजार तीनशे पंधरा रुपये दंड आकारून आदेश पारित करण्यात आला होता गैरअर्जदार यांनी यावर उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कडे आपिल दाखल करण्यात आली असल्याने या प्रकरणी फेर चौकशी करून 17/06/2019 मध्ये नव्याने आदेश परित करून दंड कायम करण्यात आला होता , गैरअर्जदार यांनी यामधून बचाव करण्यासाठी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कडे दुसऱ्यांदा अपील दाखल करण्यात आली असल्याने 3 मार्च 2020 रोजी हे प्रकरण उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी सलग दुसऱ्यांदा फेर चौकशी साठी महागाव तहसीलदार याना फेरचौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते हे प्रकरण जवळपास एक वर्षापासून चालू असलेल्या या फेरचौकशी प्रकरणांमध्ये तहसीलदार महागाव यांनी सलग दुसऱ्यांदा या उत्खनन प्रकरणी फेरचौकशी करून गैरअर्जदार शिवाजी गणेश देशमुख यांनी 1198 ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे 28,75315 रुपये दंड कायम करून 5 मार्च 2021 रोजी आदेश पारित करण्यात आला आहे. या प्रकरणी महसूल विभाग शासनाचा दंड वसूल करून महसूल खात्यात जमा करणार , की अवैध उत्खनन करणाऱ्यांना वारंवार पाठीशी घालणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे .

Copyright ©