Breaking News यवतमाळ

मुलकी परिसरात युवकाचा खून

 

यवतमाळ येथील मुलकी परिसरात 25 वर्षीय युवकाचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना आज यवतमाळ येथे घडली प्रफुल उर्फ बाबा गणेश बडदे असे मृतकाचे नाव असून हा युवक मुलकी परिसरात राहत होता या युवकाचा धारदार शस्त्राचे घाव घालून रात्री दोन वाजताच्या सुमारास निर्घुण खून करण्यात आला अवैध दारू व जुगार या खुनाचे रहस्य असल्याचे परिसरात बोलल्या जात आहे शहरात दिवसेंदिवस खुलेआम चोऱ्या मारामारी लुटमारी अशा घटना वाहन चोरी, च्या घटना सतत घडत असल्याने सध्या पोलिस प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे परिसरातील नव्हे तर ग्रामीण भागातही शुल्लक कारणावरून हाणामारी खून अशा घटना दररोज घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे याप्रकरणी पोलिसांनी ठोस पावले उचलून शहरात वर शहराबाहेरील सुरू असलेले अनाधिकृत व्यवसाय तसेच तरुणवर्गात विविध वेसण जडले आहे अनेक ठिकाणी मद्यपींचा मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे या खुणा मागील असलेल्या गुन्हेगार सतीश कुचनकर दाडेकर ले आऊट, व गोलु उर्फ सूरज घायवान रा. राधाकृष्ण नगरी ( मुलकी) याना ३०२/३४ अन्वेय त्वरित अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पोलिस निरीक्षक मनोज केदारे याच्या मार्ग दर्शनाखाली पोलिस उपनिरक्षक दर्शन दिकोंडावार व प्रदीप कुरडकर हे करीत आहे शहरात महिला चोरांचा हि चौका चौकात कहर दिसून येत आहे

Copyright ©