यवतमाळ

तहसिल कार्यालय व ग्राहक न्याय परिषदेच्या वतीने ग्राहक दिन

तहसिल कार्यालय कळंब व ग्राहक न्याय परिषद कळंब च्या वतीने जागतिक ग्राहक दिन तहसिल कार्यालयात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनिल चव्हाण तहसिलदार कळंब तर प्रमुख अतिथी म्हणून श्री राजाभाऊ वेटे, निवासी नायब तहसिलदार, श्री. अशोक उमरतकर, जिल्हा संघटक, ग्राहक न्याय परिषद उपस्थित होते. याप्रसंगी पुरवठा विभागातील सर्वश्री मंगेश ढवळे, तालुका पुरवठा अधिकारी, गणेश शिरपुरकर, श्रीमती मंगला नरांजे यांचा सत्कार करण्यात आला. श्री अशोक उमरतकर, डॉ सुनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक मंगेश ढवळे यांनी केले. याप्रसंगी अमोल भोयर,रूस्तम शेख , सिध्देश्वर वाघमारे, पुष्पा पिसाळकर, सौ. आशा कोमटी, आर. बी. देशमुख, उपस्थित होते. कोरोनाच्या संदर्भात असलेले सर्व निर्बंध पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.

Copyright ©