यवतमाळ

व्यवसायीकांनी कोव्हीड-१९ चाचणी करणे बंधनकारक

न प मुख्याधिका-याचे शहरवासीयांना आवाहन

घाटंजी :- जिल्ह्यातील कोरोनाच्या संकटात दिवसेन दिवस मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये घाटंजी तालुक्यात याबाबिवर सध्या नियंत्रण वाटतो मात्र घाटंजी तालुक्यावर ती गंभीर वेळ येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र प्रशासनाला जनतेने सहकार्य करणे गरजचे आहे असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केले आहे.
शहरातील सर्व व्यापारी वर्ग , दुकानदार , विक्रेते , पानठेला चालक , कंत्राटदार , हेअर सुलन व ब्युटी पार्लर चालक , ॲटो चालक , फळ – भाजी विक्रेते आपणा सर्वांनी लवकरात लवकर कोव्हीड -१९ ची चाचनी करुन घेण्यात यावी असे मा. जिल्हाधिकारी , यवतमाळ यांचे आदेश प्राप्त झाले आहे. या आदेशानुसार सर्व व्यवसायीकाना कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे . सदर चाचणी निशुल्क असुन , दररोज तहसिल कार्यालय , घाटंजी येथिल सभागृहात कोरोना ची चाचणी केली जात आहे. सदर चाचणीसाठी केवळ आधार कार्ड ची आवश्यकता आहे . सर्व व्यवसायीकांनी कोरोना चाचणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र , आपल्या दुकाणात, आस्थापनेत ठेवणे बंधनकारक आहे . जे व्यावसायीक व विक्रेते कोरोना चाचणी करणार नाही त्यांचे विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल , तसेच सदर दुकान , आस्थापना सुरु करु दिल्या जाणार नाही . कोरोना चाचणी साठी काही मदत लागल्यास आरोग्य विभाग , तहसिल कार्यालय , घाटंजी अथवा नगर परिषद कार्यालय , घाटंजी येथे संपर्क साधावा . असे आवाहन डॉ . धर्मेश चव्हाण , तालुका वैद्यकिय अधिकारी घाटंजी , श्रीमती पुजा माटोडे मॅडम तहसिलदार घाटंजी व नगर परिषद मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केले आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लक्षणे अथवा कोरोना चाचणी करण्याची इच्छा आहे . अशा सर्व सामान्य नागरीकांना सुध्दा कोरोना चाचणी करुन देण्यात येईल , असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन समीती घाटंजी व मुख्याधिकारी नगर परिषद घाटंजी यांनी केले आहे .

Copyright ©