महाराष्ट्र

मुंबई ‘ती’ इनोव्हा गाडी क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची, सचिन वाझे आणि टीमकडून गाडीचा वापर

 

 

मुंबई प्रतिनिधी १४ मार्च २०२ : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. एनआयएने जी इनोव्हा गाडी काल रात्री ताब्यात घेतली तीच गाडी अँटिलियाजवळ दिसली होती. हीच गाडी पोलिस हेड ऑफिसमध्ये देखील दिसून आली होती. ही इनोव्हा गाडी CIU म्हणजे क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची असल्याचं समोर आलं आहे. याच गाडीचा वापर सचिन वाझे आणि त्यांची टीम करत होती.

विशेष बाब म्हणजे घटनेनंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठवलं होतं. म्हणजे एका उद्देशाने ही कार पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेरिंगसाठी पाठवण्यात आली होती, जेणेकरुन ही गाडी कुणाच्या नजरेत येऊ नये. या सर्व गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर अनेकांवर कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे.

Featured

Copyright ©