यवतमाळ

रवीआडे यांचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक म्हणून होणार सन्मान

चेंबूर मुंबई येथे होणार सन्मान

बालरक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील शिक्षण वंचित गरिब, शाळाबाह्य, ऊस तोड कामगार भटकंती करणारे विद्यार्थी यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या बालरक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी व अधिकाऱ्याचा सन्मान सोहळा आणि एका साध्या समतेसाठी या बालरक्षकांच्या अनुभवाच्या पुस्तकाचे प्रकाशन आचार्य कॉलेज चेंबुर, मुंबई येथे शनिवार दिनांक ३ एप्रिल २०२१ आयोजित केला आहे. यात घाटंजी पंचायत समिती अंतर्गत सावरगाव शाळेत कार्यरत असलेले विषय शिक्षक रवी आडे सर यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मानाने सन्मानित करण्यात येणार असल्याचे बालरक्षक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज चिंचोरे, कोषाध्यक्ष प्रसेनजित गायकवाड, सचिव नरेश वाघ, अध्यक्ष डॉ. राणी खेडेकर यांनी त्यांना पत्राद्वारे कळवून निमंत्रित केले आहे.
जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले विषय शिक्षक रवी आडे सर सामाजिक हित जोपासत आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदांत्त हेतू पुढे ठेवून सतत शाळाबाह्य मुलांसह शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करीत शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. असे वास्तव जनतेसमोर आहे. रवी आडे सर जिज्ञासूवृत्ती, उत्कृष्टतेचा कर्मठध्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित, तंत्रज्ञानाचा व विज्ञानाचा वापर करीत शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न करणारे म्हणून परिचित असणारे उपक्रमशील शिक्षकाचा सन्मान हा तालुक्यातील पालक व विद्यार्थी यांना अभिमानाचा वाटत आहे. त्यांच्या कार्याची दखल बाल रक्षक प्रतिष्ठानने घेवून त्यांचा सन्मान होणार ही बातमी कळताच तालुक्यातील त्यांच्या चाहत्या वर्गात आनंद संचारला असून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©