यवतमाळ

जिल्ह्यात तीन मृत्युसह 346 पॉझेटिव्ह 224 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 346 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 224 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80 पुरुष आणि 72 वर्षीय महिला तसेच दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 346 जणांमध्ये 198 पुरुष आणि 148 महिला आहेत. यात यवतमाळातील 90, पुसद 70, महागाव 64, उमरखेड 37, दिग्रस 22, पांढरकवडा 17, दारव्हा 14, बाभुळगाव 5, घाटंजी 6, मारेगाव 3, नेर 4, राळेगाव 8, वणी 5 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.

शनिवारी एकूण 2668 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 346 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2322 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2477 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 21265 झाली आहे. 24 तासात 224 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18287 आहे. तर जिल्ह्यात एकूण 501 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 182435 नमुने पाठविले असून यापैकी 181248 प्राप्त तर 1187 अप्राप्त आहेत. तसेच 159983 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.



अस्तित्व फाउंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ – 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अस्तित्व फाउंडेशन तर्फे महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करोनाचे संकट बघता ह्या सर्व स्पर्धा ऑनलाइन व्हिडिओ द्वारे घेण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, मॉडन लूक विथ परफेक्ट मॅचींग आणि आदर्श ऐतिहासिक सामाजिक व राजकीय महिला वेशभूषा अशा तीन प्रकारे स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. तसेच सेल्फी विथ मेड हा नवीन उपक्रम राबवण्यात आला.
यामध्ये पारंपारिक मराठी वेशभूषाचे नियोजन व नोंदणी अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा अलका कोथळे यांच्याकडे होते. मॉडर्न लूक विथ परफेक्ट मॅचींग स्पर्धेचे नियोजन व नोंदणी कुमारी डिम्पल नक्षणे यांच्याकडे होते, तर आदर्श महिला वेशभूषेचे नियोजन व नोंदणी सौ सुरुचि खरे यांनी केले . यामध्ये एकूण 53 महिलांनी आपला सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धे मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा या स्पर्धे साठी नागपुरातील सौ नेत्रा पोहनकर तर मॉडर्न लूक विथ परफेक्ट मॅचींग साठी यवतमाळ येथील सौ. ज्योती देशमुख व आदर्श महिला वेषभूषे करिता अहमद नगर येथील डॉ. सौ अश्लेषा भांडारवार यांनी परीक्षण केले. पारंपारिक महाराष्ट्रीयन वेश मध्ये 1)प्रथम सौ रिया- संजय गटलेवार. 2) द्वितीय सौ. सरला इंगळे, 3)तृतीय सौ. भावना शेटे यांना प्राप्त झाला. मॉडर्न लूक विथ परफेक्ट मॅचींग स्पर्धेमध्ये 1) प्रथम सौ. आरती राजेश मनक्षे, 2) द्वितीय सौ. रिया गटलेवार तर 3) तृतीय सौ रितू सचिन गायकवाड यांनी प्राप्त केला. आदर्श महिला वेशभूषेचे मध्ये 1) प्रथम सौ. रूपाली निमकर, 2) द्वितीय सौ. पूनम शेंडे, 3)तृतीय सौ. वंदना वने यांनी पटकावला. यानंतर एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे सेल्फी विथ मेड हा कार्यक्रम घेण्यात आला. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली अशी एक मैत्रिण आहे जिच्याशिवाय आपले घर काम व साफसफाई अपूर्ण आहे. एक दिवस ती रजेवर गेली तर घराचे सारे नियोजन विस्कळीत होतात. आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित राहतात. लॉकडाऊन च्या काळात तिची अनुपस्थिती आपल्याला आवर्जून जाणवली. अशी हि नकळत आपल्या घरात आपली होऊन काम करणारी आपली मैत्रीण हिला भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा साडी चोळी, शाल श्री फळ, कपडे, बॅग, पर्स धान्य किट, पुष्पगुच्छ व जीवनावश्यक वस्तू देऊन जवळपास 26 ते 27 घर काम करणार्‍या आपल्या मैत्रिणींचा सत्कार करण्यात आला. सेल्फी घेऊन उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ अलका कोथळे, योगिता शिरभाते, सुरूची खरे ,डिंपल नक्षणे ,कविता बोरकर, वर्षा पडवे , प्रज्ञा नरवाडे, प्रतिभा पवार, सुषमा राईचुरा, नीता मानकर, प्रियांका गोडे ,माधवी धोटे, अपर्णा परसोडकर, सुनिता अलोणे, रितू गायकवाड, विजया शिरभाते,हर्षा कहारे ,अश्लेषा कार्लेकर, रिया गटलेवार, कल्पना ठाकरे डॉक्टर मंगला निकम स्वाती सहस्त्रबुद्धे यांचा सहभाग होता. शीला हुंकरे, प्राजक्ता डोंगरे, सीमा घोडमारे, मीराताई, वंदना किनाके, कुसुम बाई उषाबाई संगीता दांडेकर जयश्री चौधरी स्नेहल कांबळे सुनीताबाई कमलाबाई मेश्राम आशा हाडे उज्वला कोटकर निशा जगणेवार, अश्विनी खैरे, पूजाबाई, मंजुबाई वगैरे सोनू कोसे कर किरण जयस्वाल या चा सत्कार करण्यात आला.

Copyright ©