यवतमाळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात दोन शिफ्टमध्ये काम

 

मुंबई प्रतिनिधी दिनांक १३ मार्च २०२१- एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयात चालतो त्या मंत्रालयातील मंत्री, कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत.अशा वेळी राज्यातील जलसंधारण विभागाने एक वेगळं पाऊल उचलले आहे. ते म्हणजे मंत्रालयात त्या विभागात दोन शिफ्टमध्ये कामकाज करण्यात येणार आहे.
जलसंधारण विभागाने सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट केलेल्या आहेत. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. मंत्रालयात येणारे कर्मचारी यांना लोकल ट्रेन बस मधून प्रवास करावा लागतो. त्या गर्दीत ही कोरोना धोका कायम आहे. एकाचवेळी अनेक कर्मचारी असण्यापेक्षा दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी विभागून जलसंधारण विभागाने एक प्रयत्न केला आहे.

Copyright ©