विदर्भ

मुरूम ते करूम रेल्वे स्टेशन रस्त्यावर जिवावर बेतण्याचे संकट.

 

पुलावरील स्लॅबचे लोखंडी गज उघडे पडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज

कुरुम गावापासून तर करून रेल्वे स्टेशन पर्यंत ३ किलोमीटरचा रस्ता हा गेल्या कित्येक वर्षापासून अत्यंत दुरावस्थेत सापडलेला आहे. राजकीय लोकप्रतिनिधींचे प्रचंड दुर्लक्ष, संबंधित विभागाची डोळेझाकपणा,थातुरमातुर खड्डे बुजवून वेळ मारून नेण्याची नेहमीची पद्धत, यामुळे ३ किलोमीटरचा रस्ता ३० किलोमीटरचा वाटतो.या  दरम्यान असलेल्या पुलाची दुरावस्था झालेली असून एका बाजूने पुलावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तर पुलाच्या स्लॅबचे लोखंडी गज निघून ते वरती आलेले आहेत. त्यामुळे या मार्गावर कधीही एखादी अप्रिय घटना किंवा मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झालेला आहे.या रस्त्यावर या पूर्वी बऱ्याच दुर्घटना घडलेल्या असून अनेकांना आपले  हात पाय  फॅक्चर करून घ्यावे लागलेले आहेत.या रस्त्यावरून पावसाळ्यात  गड्डे पावसाच्या पाण्याने भरलेले असल्यामुळे दिसत नाही.  त्यामुळे बरेच अपघात  झालेले आहे.आता तरी संबंधित विभागाने या रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती करावी अन्यथा अप्रिय घटना घडल्यास त्याला संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असे गावकरी म्हणत आहेत. सद्यस्थितीत रेल्वे जरी बंद असला तरी या रस्त्यावरील वाहतूक मात्र सुरू आहे.अनेक गावांना सदर रस्ता जवळचा रस्ता असल्याने विविध गावातील लोकांचे जाणे-येणे सुरु असते. अनेक जण दुचाकीवर आपल्या मुलाबाळांसह जाणे-येणे करतात. रात्रीच्या वेळेस या मार्गावरून जाणे धोकादायक आणि जीवघेणे ठरू शकते.या मार्गावरून चालणारे ओव्हरलोड वाहनांची देखील संख्या मोठी आहे.त्यामुळे देखील हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. गजानन या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका वाहन चालकाचा मृत्यू देखील झाल्याची घटना घडलेली आहे. सदर मार्ग हा दीडशे वर्ष ब्रिटिश कालन जुना मार्ग असून या मार्गाचे २००९ साली प्रधानमंत्री सडक योजने द्वारा डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र  रस्ता सतत दुर्लक्षित राहीले. कुरूम ते कुरुम रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या या रस्त्यावर कुठेही पथदिवे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पुलावरील निघालेले लोखंडी राँड मुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. या रस्त्यावर कुरुम ते कुरुम रेल्वे स्टेशन पर्यंत पथदिवे लावण्यात यावे अशी मागणी देखील जोर धरत आहे.

 

 

 

 

 

———————————————————

Copyright ©