विदर्भ

भरधाव कारच्या धडकेने महिला जागीच ठार 

 

(काटेपूर्णा येथील आरामशीन जवळील घटना)        

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील काटेपूर्णा गावालगत असलेल्या आरा मशीन जवळ भरधाव वेगात आलेल्या वँगनार कारने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला जोरदार धडक दिल्याने कुरणखेड येथील महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दि.१२ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर असे की राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कुरणखेड खर्डा भिमनगर येथील रहिवासी फुलमा भानुदास मोहोड वय ३० वर्ष व इतर दोन महिला शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या.दरम्यान शेतातील काम करुन  घरी परत येत असताना काटेपुर्णा येथील आरा मशीन जवळ  मुर्तीजापुर कडून अकोलाकडे  भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगन आर  गाडी क्र. एम.एच. १२ जी.सी.६१५७  या व्हॅगनार गाडीने  फुलामा मोहड  घरी परत जात असताना

जोरदार धडक दिली. या अपघातात सदर  महीला गंभीर जखमी झाली व घटनास्थळी मृत्यू झाला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान अपघातानंतर सदर कार मधील चालका सह अन्य पसार झाले.कार येवढ्या वेगात होती की,अपघात झाल्यानंतर कारणे दोन ते तीन पलट्या खाल्ल्या. आणि रस्त्याच्या कडेला कार पलटी झाली.पलटी झालेली गाडी स्थानिक नागरिकांनी रोडच्या कडेला उचलुन ठेवली.  घटनास्थळी पोलीस कर्मचारी नामदेव केंद्रे, सतिष सपकाळ, होमगार्ड संतोष माळोकार पोहोचले होते. पुढील तपास बोरगाव मंजू  पोलीस करीत आहेत

Copyright ©