यवतमाळ

वंचित बहुजन आघाडी घाटंजी च्या वतीने वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांना अभिवादन

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रीय क्रांतीकारी शहीद योद्धा आदिवासी इतिहासातील सुवर्ण पुष्प विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १८८ व्या जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी दरवर्षी शहीद दिन आयोजीत केला जाते. यावेळी विर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर तसेच आदिवासींची संस्कृती, आदिवासींचे रिती रिवाज, गोटुल संस्कृती, आदिवासी समाजाची दशा व दिशा तसेच पुढील वाटचाल या विषयावर प्रकाश टाकण्यात आला.
भारताच्यास्वातंत्र्यलढयात आदिवासींची भूमिकामहत्वाची राहलेली आहे.इंग्रजांच्या विरोधात त्यांनी सुरवातीपासूनच बंड पुकारण्यास सुरवात केली. इंग्रजांना भारतात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी येथिल सावकार आणि जमीनदार यांनी मदत केली या सावकार जमिणदाराणा धडा शिकविण्याचे काम अनेक आदिवासी योद्ध्यांनि केले. आदींवासींच्या आजच्या परिस्थितीकडे पाहून आपण त्यांचा लढाऊ इतिहास व मानव जातीच्या कल्यानाच्या मुळाशी असणारी संस्कृती यांच्याकडे दुर्लक्ष करतोय .इतिहासाची काही अलिखीत पाने चाळण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला तर असे हजारो आदिवासी वीर या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाल्याचे दिसून येईल असे मत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे व्यक्त केले.याप्रसंगी सुकाणू समितीचे भगवान बन्सोड,सुभास सलाम,विनोद पेंदोर,खुमेश मडावी ,दिलीप राठोड,नाझीर खाण,उमेश घरडे,दीक्षांत वासनिक,साहिल रामटेके,रा.वि. नगराळे,संजय कांबळे,विजय गजभिये अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©