यवतमाळ

घाटंजी येथे छत्रपती संभाजी महाराज स्मृतिदिन

 

घाटंजी स्थानिक बसस्थानक चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन विश्वरूप फाउंडेशन घाटंजी च्या वतीने करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभारात अचाट धैर्या अजोड पराक्रम असामान्य शौर्य या वीशेष गुणांनी ओळखले जायचे शिवाजी महाराजांनंतर त्यानी राज्याची धुरा सांभाळली मोघल आदिलशहा सिद्धी पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूचा छडा लावत त्यांना चांगले झुंजवले राजकारण . मुत्सद्देगिरी समाजकारण धर्मकारण यांच्यात मुरलेले रणांगणाचे शेर होते असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वरूप फाउंडेशन चे कार्याध्यक्ष सुनील भाऊ नगराळे हे होते तर प्रमुख पाहुणे बि टी वाढवे हे होते या वेळी संतोष ओंकार अध्यक्ष विश्वरूप फाउंडेशन घाटंजी शुभम नगराळे उपाध्यक्ष विश्वरूप फाउंडेशन घाटंजी विजय गजबे . मोहन पेटेवार या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच जी वाय गेडाम बस स्थानक प्रमुख सुभाष शिवणकर चालक बी. एम. बारला्आर वाहक दामेश्वर वेट्टी हे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र मुनेश्वर सचिव विश्वरूप फाउंडेशन घाटंजी तर आभार प्रदर्शन सुजल भालेराव यांनी केले.

Copyright ©